मराठी तरुण मुंबई ते लंडन करणार बाईकनं प्रवास

बाईकहून जगाची भ्रमंती करण्याची अनेक रायडर्सची इच्छा असते. 

कऱ्हाडमधील एक तरुणही आतामुंबई ते लंडन हा प्रवास बाईकनं करण्यासाठी सज्ज झालाय.

योगेश आलेकारी असं या तरुणाचं नाव आहे. योगेश नुकताच मुंबईमध्ये आला होता. 

त्यावेळी त्यानं त्याचा आजवरचा अनुभव तसंच जगभ्रमंतीबाबत माहिती दिली.

गेल्या सहा ते सात वर्षांपासून योगेश बाईक रायडींग करत आहे.

सुरुवातीला महाराष्ट्रातील गडकिल्ले ट्रेकिंग करून, बाईक रायडींग करून सर केले. 

 त्यानंतर भारतात 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त बाईक रायडींग केलंय.  

योगेशनं आता मुंबई ते लंडन असा बाईकनं प्रवास करण्याचा निश्चय केलाय. 

तो 24 देश आणि 3 खंडांमधून 25000 किलोमीटर प्रवास करणार आहे. 

महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी त्याचा हा प्रवास सुरू होणार आहे. 

100 दिवसांमध्ये तो हा प्रवास पूर्ण करेल.