..तरच व्हाल कराटे चॅम्पियन!
आजकाल विविध कला, क्रीडा प्रकारांकडे चिमुकल्यांचा कल वाढताना दिसून येतो आहे.
सध्या पालकांनाही आपल्या मुलांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे वाटते.
वर्धा जिल्ह्यातील अगदी 5-6 वर्षांचे चिमुकली मुलं, मुलीही कराटे प्रशिक्षण घेत आहेत.
अनेक मुलं कराटेमध्ये राज्य ते राष्ट्रीय पातळीपर्यंत बक्षीस मिळवत आहेत.
कराटे क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर विशेष मेहनत घेणे ही गरजेचे आहे.
मोबाईलच्या आहारी जाऊ नये आणि सकस आहार घ्यावा, असं आवाहन प्रशिक्षकांकडून करण्यात येतंय.
मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण उपयोगी ठरते.
कराटे चॅम्पियन बनण्यासाठी आपल्या ध्येयावर कायम राहणं गरजेचं असतं.
मुलांना शिक्षणासोबतच एखाद्या खेळांतही नैपुण्य असणं गरजेचं असतं, त्यासाठी कराटे चांगला पर्याय आहे.
Click Here