एखादा दिवस, महिना किंवा वर्ष संपून नव्याने सुरू होत असेल तर अनेकजण आपलं भविष्य पाहतात.
आता ऑगस्ट 2023 महिना सुरू होत असून हा महिना आपल्यासाठी कसा असेल याची उत्सुकता अनेकांना असेल.
पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी कन्या राशीच्या लोकांचं भविष्य सांगितलं आहे.
कन्या राशीच्या लोकांना 18 ऑगस्ट पर्यंत खूप खर्च होण्याची शक्यता आहे.
वादीवाद टाळत कन्या राशीच्या लोकांनी शक्यतो कोर्ट कचेरी पासून लांब राहावे.
आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार, पाय दुखणे, छोटा अपघात होण्याची शक्यता आहे.
शुक्र हा महिनाभर लाभ स्थानात वक्री असल्याने आर्थिक आवक चांगली राहील. घर, प्रॉपर्टी, जागेचे लाभ होतील.
या काळामध्ये पैशाचा ओघ राहील, नवीन मित्र मैत्रिणी भेटतील, विवाह जमतील, पाहुण्यांची वर्दळ राहील.
मंगळाची काळजी घेण्यासाठी गणपतीची उपासना या लोकांनी करावी. दुर्गा उपासना करावी, हनुमान चालीसा वाचावी.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित असून शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.
तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल?
Click Here