कल्याणच्या तरुणानं बनवली भन्नाट 4x4 

नेहमीच्या पद्धतीपेक्षा हटके विचार करत निर्मिती करणाऱ्या मंडळींबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. 

 त्यापैकी काही जणांच्या संशोधनाला 'जुगाडू' हे अस्सल भारतीय नाव देण्यात आलंय. 

आपल्या आजूबाजूला असे अनेक जुगाडू मंडळी आहेत. जे आपलं डोकं चालवून एखाद्या वेगळ्याच गोष्टीची निर्मिती करतात.

कल्याणच्या अनिरुद्ध शेटे या तरुणानं देखील एक जुगाडू गाडी बनवलीय. 

तो ही गाडी रस्त्यावर चालवतो त्यावेळी सर्वजण त्याकडं कुतुहलानं पाहतात.

 पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या 'सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेत' अनिरुद्धनं या गाडीच्या जोरावर बाजी मारलीय.

अनिरुद्धकडे जिप्सी गाडी आहे. या गाडीचे इंजिन त्याने मॉडीफाय केले आहे. 

इंजिनची 1600 क्युबिक कॅपासिटी असून ही गाडी पंजाबमध्ये बनवल्याचं अनिरुद्धनं सांगितलं.

 या गाडीमध्ये मारुती सुझुकीच इंजिन वापरल असून काही पार्टस महेंद्र पीकअपचे आहेत.

नॉर्मल गाडीला फक्त पुढे स्टेरिंग असते. ह्या गाडीला मागेसुद्धा स्टेरिंग असल्याने पुढचे टायर जसे वळतात अगदी तसेच मागचे टायरही वळतात. 

या गाडीची किंमत जवळपास 15 लाख असून अशा प्रकारची ही महाराष्ट्रामधील एकमेव गाडी असल्याचं अनिरुद्धनं सांगितलं. 

दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!

Click Here