साई मंदिरात नंदी पितोय दूध?

 राज्यातल्या वेगवेगळया मंदिरात चमत्कारच्या अनेक चर्चा रंगलेल्या तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील.

एखाद्या गणपती मंदिरात बाप्पाची मुर्ती मोदक खाते, कुठं शंकराची पिंड तिळातिळानं वाढल्याची चर्चा होते.

 कल्याणमधीलएक मंदिरही सध्या चर्चेत आलंय. या मंदिरातील नंदीची मूर्ती दूध पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

यामगील नेमकं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कल्याणच्या खडेगोवलावली भागातील साई शक्ती कॉलीनीमध्ये साई मंदिर आहे. 

या मंदिरातील नंदीची मूर्ती दूध पित असल्याची चर्चा रंगली होती. भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या पुजाऱ्याने पूजा केली. 

त्यानंतर नंदीच्या मूर्तीच्या तोंडाजवळ दुधाने भरलेला चमचा ठेवताच नंदी दूध पितोय, असं पुजाऱ्यानं सांगितलं. पुजाऱ्यानं ही माहिती भाविकांना दिली.

त्यानंतर अवघ्या काही मिनिटात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

लोक वाट्या, ग्लास इत्यादींमध्ये दूध घेऊन मंदिरात पोहोचले आणि चमच्याने नंदी महाराजांच्या मूर्तीला दूध पाणी पाजू लागले. 

नंदीच्या मूर्तीला काल साधारणतः 4 ते 5 लिटर  दूध,पाणी देण्यात आले. मंदिरातील हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. 

पुरुष दूध,पाणी घेऊन मंदिरात धाव घेऊ लागले, काही महिलांनी आमच्या हाताने नंदीने दूध प्यायल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली होती.

टीप : व्हायरल व्हिडीओची माहिती देण्यासाठीच ही बातमी देण्यात आली आहे. News18 लोकमत या व्हिडीओची पृष्टी करत नाही. त्याचबरोबर कोणत्याही अंधश्रद्धेला चालना देत नाही.

दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!

Click Here