सध्या सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. वाढत्या उन्हाळ्यात थंड खावं वाटणं हे सहाजिक आहे.
अनेकदा पोटात थंडावा राहावा म्हणून आपण नारळ पाणी पितो. आरोग्यदायी असं हे नारळपाणी कोकोनट क्रीम ज्यूस या नव्या फ्लेवरमध्ये मिळू लागलंय.
कल्याणमधील एका ज्यूस सेंटरमध्ये हा प्रकार मिळतोय. हा पदार्थ अगदी कमी कालावधीमध्ये सुपरहिट झालाय.
हा हटके पदार्थ बनवण्याची रेसिपी देखील तितकीच खास आहे. गोल नारळ फोडल्यानंतर त्याची पाणी बाजूला केलं जातं.
त्यामधील खोबरं तसेच जो फ्लेवर मागितलं असेल त्या फळाचा ताजा गर, बर्फ, फ्रेश क्रीम, दूध, पिठीसाखर, मिल्कमेड, बर्फ हे सर्व जिन्नस टाकून ते मिक्सरमध्ये फिरवले जातात.
त्यानंतर नारळातून पाणी आणि खोबरं काढलं जातं.
त्यामध्ये ड्रायफूट आणि ज्या फळाचा फ्लेवर सांगितलाय ते काप टाकून ही आकर्षक डिश ग्राहकांना दिली जाते.
या कोकोनट क्रीमची किंमत 120 रुपये आहे.
कुठं मिळेल?
मकसूद ज्यूस सेंटर, दूध ना पार नाक्याजवळ, कल्याण (पश्चिम)
Click Here