300 मुक्या जिवासाठी स्नेहा झाली देवदूत!

आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या जातींची विदेशी कुत्री पाळण्याची क्रेझ शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतीय. 

पाळीव कुत्र्यांची काळजी तर प्रत्येकजण घेत असतो. परंतु, रस्त्यावर भटकणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे कुणाचेही लक्ष नसते. 

अनेकदा त्यांना आजार होतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू देखील होतो. 

बऱ्याचदा अपघात होऊन ते मरतात.एकंदरीत भटक्या कुत्र्यांची हेळसांड होत असते. 

 हीच गोष्ट लक्षात घेऊन जालना शहरातील एक तरुणी पुढे आली असून या भटक्या कुत्र्यांना जीवदान देण्याचं काम ती करतेय.

नवीन जालना भागात राहणाऱ्या या तरुणीचे नाव स्नेहा बजाज आहे. 

स्नेहा यांना प्राण्याची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे भटक्या प्राण्याची होत असलेली हेळसांड त्यांना पाहवत नव्हती. 

म्हणून त्यांनी स्वतः च्या स्तरावर या प्राण्यांची मदत करण्यास सुरुवात केली. हळूहळू या कामाला लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळू लागला. 

मग त्यांनी हे काम अधिक प्रभावी आणि जोमाने सुरू केलं. सध्या त्या मिशन हॉस्पिटल परिसरातील 100 कुत्र्यांना दररोज खाद्य देतात. 

तर आता पर्यंत त्यांनी 300 आजारी कुत्र्यांना रेस्कू करून त्यांच्यावर उपचार केले आहेत.

 ‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट

Click Here