फक्त पावसाळ्यातच येते ही रानभाजी

बाजारातील पालेभाज्या आपल्याला माहिती असतात, मात्र काही रानभाज्या या विशिष्ट दिवसांतच येतात.

पावसाळा या अशा रानभाज्या उगवण्यासाठी अतिशय योग्य काळ असतो. 

याच काळात अनेक दुर्मिळ रानभाज्या शेतात किंवा परिसरात उगवत असतात. 

अशीच पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी म्हणजे झेटूनीची फुले होय. 

अतिशय दुर्गम भागात काटेरी झुडपांवर हा वेल पसरतो आणि त्यावर छोटे छोटे फुलांचे गुच्छ असतात. 

पाऊस पडल्यानंतर 21 दिवसांनी या वेलींना बहर येतो आणि त्यावर ही फुले लागतात. 

पावसाळ्यातील केवळ 15 ते 20 दिवसच उपलब्ध असणाऱ्या या फुलांची चवदार भाजी बनवली जाते. 

अतिशय दुर्मिळ असल्याने सहसा ही फुले बाजारात उपलब्ध होत नाहीत. 

बारीक कापलेला कांदा, तिखट, मीठ आणि तेल एवढ्या कमी साहित्यात फुलांची चवदार चटणी होते. 

अतिशय चवदार झेटूनीच्या फुलापासून तयार केलेली भाजी आम्ही दरवर्षी खातो, असं विठ्ठल काळे सांगतात.

कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती

Click Here