शेळीपालनातून शेतकरी बनला लखपती!
मराठवाड्यातील शेतकरी अनेक संकटांना वेळोवेळी तोंड देत असतो.
कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळी तर कधी अवकाळी या सगळ्यातून सावरल्यास बाजारात दर मिळत नाही.
त्यामुळे शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी वेगवगेळे व्यवसाय करत असतात.
जालना जिल्ह्यातील खरपुडी गावातील कैलास शेजुळ हे देखील शेतीला जोड धंदा म्हणून शेळी पालन करतात.
याचं शेळीपालन व्यवसायातून त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
कैलास शेजुळ हे जालना जिल्ह्यातील खरपुडी या गावचे रहिवासी आहेत.
त्यांच्याकडे 5 एकर कोरडवाहू जमीन आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न निघत नव्हते.
त्यामुळे हतबल झालेल्या शेजुळ यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार शेळी पालन व्यवसायास सुरुवात केली.
2016 मध्ये त्यांनी उस्मानाबादी या जातीच्या 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदी केले. यानंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवत नेला.
सध्या त्यांच्याकडे 50 शेळ्या आहेत. बकऱ्याची विक्री ते 4 ते 5 हजार रुपये दराने करतात.
मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी 5 ते 6 लाख रुपये कैलास शेजुळ बकऱ्याच्या विक्रीतून कमवतात.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here