देने वाला जब भी देता देता छप्पर फाडके, असा एक फिल्मी डायलॉग आपण ऐकला असेल.
जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याबाबत हा डायलॉग खरा ठरलाय.
अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागलीय.
जामखेडचे शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात.
यातील एका शेळीने बोकडाला जन्म दिला आणि प्रदीप यांचं नशिबच पालंटलं.
या बोकडाच्या डोक्यावर विशिष्ट खून असल्याने बोकडाचं चांगलं संगोपन केलं.
सध्या हा बोकड चौदा महिन्यांचा झाला असून त्याला बाजारात चांगली मागणी आहे.
आतापर्यंत बोकडाला तीन ते दहा लाखांपर्यंत बोली लागली आहे.
महागडा बोकड चोरी जाण्याची शक्यता असल्याने चौघेजण त्याच्यावर पाळत ठेवून आहेत.
आम्हाला बोकडाच्या विक्रीतून 12 ते 15 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंगल गर्ल मैदानात!
Click Here