नोकरी नाही, काय करू? असं म्हणत परिस्थितीला दोष देणारे अनेक धडधाकट तरुण आपण पाहतो.
तसेच अगदी विपरित परिस्थितीमध्येही मार्ग काढण्यासाठी धडपडणारी मंडळीही आहेत.
दोन्ही पायानं अपंगत्व, घरातील परिस्थिती बेताची तरीही मुंबईच्या तरुणाची जिद्द प्रेरणादायी आहे.
खचून न जाता, कुणापुढे हात न पसरता प्रवीण शिंदे हा फुड डिलिव्हरीच्या क्षेत्रात काम करत आहे.
मुंबईतील चांदिवलीमध्ये राहणाऱ्या प्रवीणला दीड वर्षाचा असतानाच पोलिओ झाला.
प्रविणनं एसवाय बीकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं पण प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळाली नाही.
विद्युत सायकलच्या माध्यमातून त्यानं झोमॅटो फूड डिलिव्हरी मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
सध्या प्रवीण मुंबईतील पवई परीसरात फूड डिलिव्हरीचं काम करत आहे.
प्रवीण शिंदे याचा संघर्षमयी प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!
Click Here