नवरा अन् बायको दोन्ही करतात कतरिना कैफची पूजा; पण का?
आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची पूजा करताना तुम्ही लोकांना पाहिले असेल.
मात्र, हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्याच्या ढाणी फोगाट येथी बंटू आणि त्याची बायको संतोष हे चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ हिला देवापेक्षाही जास्त मानतात
मागच्या दहा वर्षांपासून ते कतरिना कैफचा जन्मदिवस केक कापून आणि लाडू वाटून मोठ्या उत्साहात साजरा करतात.
या दाम्पत्याला कतरिना कैफ हिच्या प्रतीचे इतके प्रेम आहे की त्यांनी घरात चारही बाजूला आत-बाहेर कतरिना कैफचे फोटो लावले आहेत.
गावातील लोक आता संतोष या महिलेला कतरिना कैफच्या नावाने ओळखतात.
बंटूने 2014मध्ये कतरिना कैफचा चित्रपट पहिल्यांदा पाहिला. यानंतर तो तिच्या प्रेमातच पडला.
यावर्षीही त्यांनी कतरिना कैफचा जन्मदिवस उत्साहात साजरा केला.
या दाम्पत्याला कतरिना कैफला भेटायची मनापासून इच्छा आहे.
तसेच एकदिवस तरी त्यांची कतरिना कैफसोबत भेट व्हावी, यासाठी ते प्रार्थनाही करत आहेत.