सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते?

नागपुरातील  संत्रा बर्फी इतकीच नागपुरी सोनपापडी प्रसिध्द असून नागपुरातील खाद्य संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. 

सोनपापडी तशी सर्वत्र बघायला अथवा खायला मिळते. मात्र, असे असले तरी नागपुरी सोनपापडीची बातच काही निराळी आहे.

नागपुरातील बजेरिया या भागात अनेक सोनपापडी तयार करणारे कारागीर स्थित असून हा व्यवसाय अनेक वर्षापासून येथे सुरू आहे.

सोनपापडी तयार करणे म्हणजे मोठ्या कौशल्य आणि प्रचंड मेहनतीचे काम आहे. 

 5 फ्लेवरमध्ये सोनपापडी तयार केली जाते, त्यात इलायची, पायनॅपल ऑरेंज, चॉकलेट, आईस्क्रीमचा समावेशअसतो असे लक्ष्मी स्वीटचे प्रोप्रायटर आशिष गुप्ता सांगतात.

सोनरोल हा देखील मोठ्या प्रमाणावर मागणीतील पदार्थ आहे. 

सोनपापडी तयार करण्यासाठी मैदा, बेसन, साखर, पाम, ऑइल, इलायची, पिस्ताचा वापर केला जातो.

अडीचशे ग्रामपासून ते एक किलोपर्यंत पाकीट स्वरूपात सोनपापडी उपलब्ध आहे. नागपूरसह इतर राज्यात मध्य प्रदेश, उडीसा गुजरातमध्ये सोनपापडी जात असते.