मटण खारीबोटी कशी तयार करतात?

भिन्न संस्कृतीचं शहर असलेल्या सोलापूरमधील खाद्य संस्कृतीमध्येही विविधता आहे.

सोलापूरमधील अनेक पदार्थ राज्यात फेमस आहेत. 

मटण खारीबोटी हा सोलापुरी पदार्थही नॉनव्हेजप्रेमींमध्ये चांगलाच फेमस आहे. ही डिश कशी बनते ते पाहूया

सुरुवातीला एका बाऊलमध्ये मटण घेऊन ते स्वच्छ धुऊन घेतात.

त्यानंतर कुकरमध्ये हळद मीठ टाकून ते व्यवस्थितपणे शिजवून घेतले जाते.

मटन शिजवून राहिलेले पाणी बाजूला काढून ते मटण सूप किंवा पुढे रेसिपीच्या भागात वापरले जाते. 

 त्यानंतर एका पॅनमध्ये तेल कांदा अद्रक लसूणची पेस्ट, मीठ आणि खोबरे टाकून फ्राय केले जाते.

तयार मसाल्यामध्ये शिजलेले मटण टाकून पॅनमध्ये पूर्वीचे मिश्रण आणि आता टाकलेले मटण हे व्यवस्थितपणे एकजीव केले जाते.

मटण शिजवताना काढलेले पाणी हे या मिश्रणामध्ये टाकून अलगद शिजवून घेतले जाते. 

यामुळे खारीबोटीसाठी टाकलेला मसाला हा मटणासोबत एकजीव होऊन व्यवस्थितपणे शिजला जातो. 

चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ही डिश खाण्यासाठी तयार होते. 

सोलापूर सोडून इतर ठिकाणी या डिशला मटण आळणी किंवा चिकन आळणी देखील म्हंटले जाते.

 ‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट

Click Here