मुंबई-सोलापूर 'वंदे भारत' आतून आहे तरी कशी?
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती.
मुंबई-सोलापूर या प्रवासातील वेळेची बचत करणाऱ्या या रेल्वेला प्रवाशाचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
अन्य गाड्यांपेक्षा 'वंदे भारत' चं तिकीट जास्त असलं तरी प्रवाशांच्या संख्येवर याचा परिणाम झालेला नाही.
कुणाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये ट्रेन ऑपरेटशी संवाद साधायचा असेल तर टॉक बॅक युनिट प्रणाली बसवण्यात आलेली आहे.
गाडी थांबवण्यासाठी पूर्वी चेन ओढावी लागत असे. वंदे भारतमध्ये एका स्पेशल बटनाच्या माध्यमातून गाडी थांबवणे शक्य आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमधील कॉमन कोचमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था चांगली आहे.
इकोनॉमी कोचमधील आरामदायी व्यवस्था. ही खुर्ची फिरवता देखील येते.
सर्वसामान्यांसोबतच अंधांना देखील आपला सीट क्रमांक व्यवस्थित वाचता यावा यासाठी सीट नंबर सांख्यिकी तसेच ब्रेल लिपीमध्ये सुद्धा लिहिण्यात आले आहेत.
प्रत्येक सीटच्या खाली मोबाईल चार्ज करण्यासाठी विशेष व्यवस्था आहे.
लहान मुलांसाठी सापशिडी खेळण्याचीही व्यवस्था आहे.
प्रत्येक कोचमधील डिस्प्लेवर गाडीचा स्पीड किती आहे आणि पुढील स्टेशन येण्यासाठी किती किलोमीटर अंतर बाकी आहे ही माहिती डिस्प्ले होते.
मुंबई-सोलापूर प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला चॅट बॉक्स देण्यात आलेला आहे. यामध्ये बाकरवडी, कचोरी ,समोसा ,गुलाबजाम आणि चिक्की हे पदार्थ मिळतात.
ट्रेनमधील सर्वच टॉयलेट हे वेस्टर्न पद्धतीचे असून ते ऑटोमॅटिक क्लीन मोडवर सेट करण्यात आलेले आहेत.
मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची मेजवानी!
Click Here