अरेच्चा, पेनाचं रुग्णालय?
माणसांचं, प्राण्यांचं रुग्णालय असतं, तसं आहे हे पेनांचं रुग्णालय.
इथे पेन दुरुस्त केलं जातं. जुने पेन संग्रहित केले जातात.
तामिळनाडूतील दिंडीगुलमधल्या मनकुंडूजवळ आहे 'शेख मायदीन पेन हॉस्पिटल'.
इथे 5 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत वैविध्यपूर्ण पेन उपलब्ध आहेत.
खास शाईच्या पेनांचा संग्रह आहे या रुग्णालयाचं वैशिष्ट्य.
इथे 30 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत पार्कर पेनही मिळतात.
1975 साली झाली होती या दुकानाची स्थापना.
एखाद्या व्यवसायात 50 वर्षांचा टप्पा गाठणं ही आहे महत्त्वपूर्ण कामगिरी.
आजोबांनी सुरू केलेला वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार आहे कौतुकास्पद.