मिरज हे ऐतिहासिक शहर असून कला आणि संस्कृतीचं प्रमुख केंद्र मानलं जातं.
पेशवाईच्या काळात उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये पारंगत असलेले कलाकार या भागात येत होते.
येथे मिळणारा राजाश्रय या कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करीत होता.
साथीला असलेली वाद्ये नादुरुस्त झाली तर ती दुरुस्त कुठे करायची याची विवंचना होती.
मिरज शहरात हत्यारांना धार लावणाऱ्या शिकलगार लोकांनी वाद्य दुरुस्तीचे काम पत्करले.
शिकलगार फरीदसाहेब सतारमेकर यांनी वाद्ये दुरुस्त करण्याचा विडा उचलला.
आदिलशाही काळात सैन्याला हत्यार बनवून देणारे हात पेशवाई काळात तंतुवाद्य निर्मितीकडे वळले.
कलेला राजाश्रय मिळाल्यानंतर मिरजेत तंतुवाद्य निर्मितीचा इतिहास रचला गेला.
आता शिकलगार खानदानातील सातवी पिढी सतारमेकर या नावाने हा व्यवसाय जोपासत आहेत.
आता मिरजेच्या सतारमेकर गल्लीमधून देशविदेशात तंतुवाद्ये पाठवली जातात.
आख्खं गावच आहे 'तेंडल्या'चं फॅन!
Click Here