पुण्यात आहे जगातील भारी म्युझियम

पुणे शहरात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या अनेक वास्तू आहेत. 

त्याचबरोबर जुन्या काळातील वस्तूंचे जतन करणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय ही देखील पुण्याची एक खास ओळख आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात या म्युझिअमची स्थापना झाली. तेव्हापासून हे म्युझियम पुणे शहराच्या वैभवात भर टाकत आहे.

कशी झाली सुरूवात?
केळकर संग्रहालयाचे व्यवस्थापकीय संचालक सुधन्वा रानडे यांनी या म्युझिमच्या स्थापनेचा इतिहास सांगितला आहे.

पद्मश्री दिनकर केळकर उर्फ काकासाहेब व्यवसायाने ऑप्टिशन होते. त्यांना ऐतिहासिक कविता करण्याचा छंद होता.

कवी अज्ञातवासी या टोपणनावानं त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. काकासाहेबांनी 1920 च्या दशकापासून ऐतिहासिक वस्तू जमवण्यास सुरूवात केली. 

त्याला 1938 - 40 च्या दरम्यान संग्रहालयाचे स्वरूप देण्यात आले. काकासाहेबाचा मुलगा राजा याचे वयाच्या दहाव्या वर्षीच निधन झाले. 

 त्याची आठवण म्हणून हे संग्रहाल उभारण्यात आले. या संग्रहालयाला त्याचं नाव देण्यात आलं. 

काय पाहता येईल संग्रहालयामध्ये?
राजा दिनकर केळकर संग्रहालयत विविध मूर्ती, विविध कला कुसरीच्या वस्तू, दगडी, 

हस्तिदंताच्या लाकडी कोरीव काम केलेल्या वस्तू, जुन्या राजा राजवाड्यांचे दरवाजे, कमानी, खिडक्या, जुनी वस्त्र प्रावरणे

सौंदर्यप्रसाधने, विविध हस्तकला शिल्पकला यांचा खजाना या संग्रहालयामध्ये पाहता येईल.