सातपुड्याच्या कुशीतून वर्धा नदी उगम पावते.
वर्धा नदीच्या तिरावर पंचधारेश्वर शिवमंदिर आहे.
पाच धारा येथील जलकुंडामध्ये पडत म्हणून पंचधारेश्वर म्हणतात.
पंचधारा परिसर निसर्गरम्य असून स्थलांतरीत पक्षीही येथे येतात.
पंचधारेश्वर शिव मंदिराबाहेर 9 समाध्या होत्या.
हे मंदिर 450 वर्षांपूर्वीचे असल्याचा इतिहासकारांचा अंदाज आहे.
वास्तू रचना, शिल्प, मूर्ती या मंदिरापेक्षाही जास्त प्राचीन आहेत.
गर्भगृह आतून विशाल, कलात्मक व कोरीव कामाने युक्त आहे.
भिंतीवर सुंदर अशा कमानी कोरण्यात आल्या आहेत.
दक्षिणेत गर्भगृहाच्या बाह्यांगावर एकूण 19 प्रतिमा आहेत.
उत्तरेत चक्र-गदाधारी विष्णूची मूर्ती असून इतर 18 प्रतिमा आहेत.
पंचधारेश्वर मंदिर हे शिवभक्तांचे श्रद्धास्तान आहे.