400 वर्ष जुन्या ऑक्सिजन हबला कशाचा धोका?

कोणत्याही शहरातील वनराई तेथील नागरिकांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. 

वाढत्या शहरीकरणामध्ये ही वनराई शहराचं ऑक्सिजन हब बनली आहे. 

 छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या 400 वर्षांपासून हे काम हिमायत बाग करत आहे.

300 एकरचा हा परिसर शहरातील वनसंपत्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे.

पण, याच बागेत कृषी विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

 त्यामुळे हे ऑक्सिजन हब धोक्यात आल्याचा दावा हिमायत बाग बचाव समितीनं केलाय.

त्यांनी या प्रकरणात कोर्टात धाव घेतली आहे.

या जागेतील जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी अ‍ॅड. संदेश हांगे यांनी 2021 साली जनहित याचिका दाखल केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बागेत असलेल्या मध्ये महिला कृषी विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषी विद्यापीठाकडे पैठण रोड जवळ जागा उपलब्ध आहे. 

त्यानंतरही हिमायत बागेसारख्या हेरिटेज ठिकाणी हा अट्टहास कशासाठी केला जात जातोय?

असा प्रश्न हिमायत बाग बचाव कृती समितीच्या अ‍ॅड. सोनकवडे यांनी विचारला आहे.