शंभो, दरवर्षी वाढतं हे शिवलिंग?
उत्तर प्रदेशच्या पोहिया गावात वसलंय
'टेढेश्वर महादेव मंदिर'.
भक्तांची आहे मंदिरावर श्रद्धा; दूर-दूरहून येतात दर्शनाला.
दरवर्षी वाढतो शिवलिंगाचा आकार; आपोआप होतो हा चमत्कार.
जमिनीतून निघालेला हा शिवलिंग सुरुवातीला होता जमिनीसम.
आज जमिनीवरील गवत आहे जसंच्या तसं, शिवलिंग मात्र 3-4 फुटांनी वाढलं.
शिवलिंगात दरवर्षी काही इंच होते वाढ, अशी आहे मान्यता.
ही महादेवांचीच कृपा, अशी आहे भक्तांची श्रद्धा.
शिवलिंग मागच्या बाजूला झुकलंय, म्हणून टेढेश्वर महादेव मंदिर नाव पडलंय.
श्रावणी सोमवारी मंदिरात असते भक्तांची मांदियाळी.