वजन आणि रक्तदाब कमी करायचा?
महानगरात प्रत्येकाची लाईफ स्टाईल ही धकाधकीची असते. या धकाधकीच्या आयुष्यात नोकरीची वेळ, घराबाहेर पडण्याची वेळ ही देखील बदलली आहे.
या सर्व बदलांशी जुळवून घ्यायचं असेल तर योग्य आहार आवश्यक आहे. अनेक जण सकाळी नाश्ता करत नाहीत.
सकाळी नाश्ता न करण्याची सवय आरोग्याला घातक ठरु शकते, असा इशारा डोंबिवलीतील आहार तज्ज्ञ डॉ. महेश पाटील यांनी दिलाय.
रोजच्या नाशत्यामध्ये काय हवं? याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
सकाळच्या वेळी पचन क्रिया सक्रिय असते. त्यामुळे सकाळचा नाश्ता टाळणे हे शरीरासाठी घातक आहे. सकाळी नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.
वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथिनांचा ( प्रोटीन्स ) वापर अधिक करणे आवश्यक आहे.
त्यासाठी मुगाचा डोसा, डाळीच्या पिठाची दीर्धी किंवा घावन, चण्याच्या पिठाचे ऑमलेट , मुगाचा शिरा, मिलेट्स, मीलेट्सचे घावने अशा पद्धतीचा आहार घेऊ शकता.
तुम्ही मांसाहारी असाल तर अंड, ऑमलेट असे पदार्थही खाऊ शकता यामुळे वजन नियंत्रणात राहते अशी माहिती डॉ. महेश पाटील यांनी दिली.
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी सैंधव मीठाचा वापर करा. या मिठामध्ये सोडियम कमी असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते असे डॉक्टर सांगतात.
एकूणच नाष्ट्यामध्ये पोटात प्रोटीन्स अधिक जावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याचबरोबर ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी सैंधव मीठ खाणे गरजेचे आहे.
बदलत्या जीवनशैली मध्ये आरोग्य सांभाळणे गरजेचे असून आहारात या गोष्टींचा समावेश करा असे डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.
दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!
Click Here