झणझणीत!
तेलात तळलेलं आईस्क्रीम खाल?
ऊन, पाऊस, थंडी ऋतू कोणताही असला, तरी आईस्क्रीम मात्र कोणालाही कधीही आवडतं.
मऊ, लुसलुशीत, गोड, थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच.
ताज्या फळांचं आईस्क्रीम, आईस्क्रीमचा केक, असे वेगवेगळे प्रकार जगभरात मिळतात.
तुम्ही कधी फाईड आईस्क्रीमबाबत ऐकलंय? जसा फ्राईड राइस, शेजवान फ्राईड राइस तसंच असतं 'फ्राईड आईस्क्रीम'.
चक्क तेलात तळतात हे आईस्क्रीम.
तेलात तळतात म्हणजे आईस्क्रीम झणझणीत असेल का?
अजिबात नाही! बाहेरून गरम आणि आतून असतं थंडगार.
आईस्क्रीमचा चावा घेताच तोंड भाजतं पण आतल्या थंडाव्यामुळे आनंद मिळतो.
तामिळनाडूच्या विलुप्पुरम्स फूड कोर्टात 120 रुपयांना मिळतं हे आईस्क्रीम.