9 लाखांची साडी? आहे तरी कशी?
लखनऊच्या अदा फॅशन स्टोअरमध्ये बनून तयार आहे 9 लाखांची साडी.
किंमत अव्वाच्या सव्वा, मात्र साडी नाही खूप भरजरी, सोन्या-चांदीच्या तारांनी जडलेली.
साडीवर आहे हिरे-माणिकांची सुरेख, सुटसुटीत नक्षी, त्यामुळे ती दिसते हलकी सुंदर अशी.
शिफॉन, चिकन कापडाच्या मिश्रणाने तयार झालेली ही साडी हिरे-माणिकांमुळे प्रचंड चमकते.
एवढी महागडी साडी नेसणार कोण?
आठवा टीव्हीवरील अवॉर्ड सोहळे, सेलिब्रिटींचे विवाह सोहळे.
समारंभांमध्ये सेलिब्रिटी साड्या नेसतात. त्या याच असतात.
9 लाखांच्या या साडीसाठी झाले आहेत अनेक बुकींग. ती तयार होण्यासाठी लागतो एका वर्षाहून अधिक महिन्यांचा कालावधी.
9 लाखात येईल परदेशात मनसोक्त फिरता, नववधूला हॉलमार्क सोन्याने मढवता. गाडीही येईल घेता.