फळांच्या राजाची नाशिकमध्ये एन्ट्री
आंब्याचा सिजन सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.
त्यात रत्नागिरी मधील हापूस आंबा हा जगभर प्रसिद्ध आंबा आहे.
त्याची चव सर्वांनाच भुरळ पाडत असते.
नाशिकमध्ये रत्नागिरीचा हापूस, देवगडचा हापूस आणि रत्नागिरीचा केशर आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे.
कोकणातील बांधव दरवर्षी आंबा विक्रीसाठी नाशिकमध्ये येत असतात. याही वर्षी शहरात आंबे विक्रीसाठी आले आहेत.
मात्र, दर चांगलेच तेजीत आहेत. 1200 रुपये डझनने आंब्याची विक्री होत आहे.
त्याला नाशिककर ही चांगला प्रतिसाद देत आहेत.
नाशिक शहरातील कालिका माता मंदिर परिसरात आंब्याचे स्टॉल आहेत.