फळांचा राजा नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल

उन्हाळा सुरु होताच सर्वांना आंब्याची प्रतीक्षा असते. 

 मुंबईकरांची ही प्रतीक्षा आता संपली आहे.

आंबा आवडणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.

नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये कोकणातील आंबा दाखल झाला आहे.

आंबा बाजारात दाखल झाल्यावर त्याची पूजा करण्यात आली.

मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देवगड आणि, रत्नागिरीचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे.

हा आंबा खरेदीसाठी मुंबईकरांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

APMC मार्केटमध्ये दाखल झालेल्या या आंब्याचा दर सध्या 4000 ते 7000 रुपये इतका आहे.