विदर्भातील दिव्यांग तरुणाने जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली आहे.
धीरज कळसाईत हा अकोट येथील 24 वर्षीय तरुण आहे.
धीरजला जन्मापासूनच मनगटाजवळून डावा हात नाही.
धीरजला गिर्यारोहण सारख्या क्षेत्राची आवड निर्माण झाली.
इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर धीरज गिर्यारोहण करायचा.
एका अपघातात धीरजचा डावा पायही निकामी झाला.
धीरज छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो.
दिव्यंगत्वावर मात करत त्याने अनेक गड-किल्ले सर केले.
धीरजने अनेक साहसी मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या.
रशियातील माउंट एल्बूज व आफ्रिकेतील किलीमंजारो हिमशिखरे सर केली.
रेस अक्रॉस इंडिया ही आशियातील सर्वात लांब सायकल स्पर्धा आहे.
12 राज्ये व महत्त्वाच्या 25 शहरांतून 3651 किलोमीटर अंतर पार करावे लागते.
धीरजने श्रीनगर ते कन्याकुमारी अंतर केवळ 13 दिवसांत पूर्ण केले.
धीरजने दररोज 300 किलोमीटर सायकल प्रवास केला.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद होणार आहे.
पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल मिळवण्याचे धीरजचे स्वप्न आहे.