ऑपरेशन करून तरुण बनला किन्नर मग...
उत्तराखंडमधील हल्द्वानीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
कष्ट न करता भीक मागून जीवन जगता यावे म्हणून तो ऑपरेशनने करून किन्नर झाला.
तो आता खऱ्या किन्नरांसाठी त्रासदायक बनला आहे.
त्याने सोशल मीडियावर किन्नरांचे अश्लील व्हिडिओ तर टाकलेच पण आता तो त्यांना ब्लॅकमेलही करत आहे.
तो किन्नरांना जीवे मारण्याची धमकीही देत असल्याचा आरोप आहे.
तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी किन्नरांचे पथक सोमवारी हल्द्वानी कोतवाली येथे पोहोचले.
काठगोदाम येथे राहणारा एक कथित किन्नर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचा आरोप आहे.
आरोपी किन्नर असल्याचे भासवून बेकायदेशीर खंडणी घेतो आणि त्याला विरोध केल्यास आत्महत्येची धमकीही देतो.