आकर्षक गुढी उभारुन करा नववर्षाचं स्वागत!

कोल्हापुरात सध्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठा सजलेल्या आहेत. 

यामध्ये सजवलेल्या गुढ्यांबरोबरच गुढीसाठी लागणारे तयार खण बाजारात आले आहेत. 

यासोबतच सजवलेले कलश देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

कोल्हापुरातील शनिवार पेठमध्ये गुढ्यांसोबतच संपूर्ण सेट विक्रीला उपलब्ध आहे. 

ज्याच्यामध्ये गुढी उभा करण्यासाठीचा पाट, तोही कापड लावून सजवलेला आहे. 

त्याचबरोबर सजवलेला कलश, गुढीसाठीचे तयार खण आणि सजवलेली गुढी असा हा सेट मिळतो. 

 याबरोबरच अजूनही सजावटीचे साहित्य गुढी सजवण्यासाठी विक्रीला उपलब्ध आहे. 

यांच्या किंमती 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यत आहेत.