सिंचनासाठी 'या' योजनेतून मिळेल 3 लाखांचं अनुदान!
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना संपन्न करण्याकरिता शासनाकडून सिंचनाच्या सोयीवर भर दिला जात आहे.
शासनाने 'मागेल त्याला विहीर योजना' सुरू केली.
पूर्वी या योजनेंतर्गत विहिरीच्या बांधकामाकरिता 2 लाख 99 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते.
आता या योजनेच्या अनुदानात शासनाने 26 हजारांची वाढ केली आहे.
गेल्या दोनतीन वर्षात वर्धा जिल्ह्यातील 245 शेतकऱ्यांनी या योजनेचा घेतला लाभ घेतला आहे.
मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 3 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. वाढीव निधीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वनहक्क कायद्याअंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येतो.
योजनेसाठी शेतकऱ्यांनी तालुका स्तरावरील कार्यालयाशी संपर्क करून अर्ज सादर करायचा असतो. याकरिता आवश्यक ती कागदपत्रे या अर्जासोबत देणे बंधनकारक आहेत.