जालन्यातील आरोग्यदायी केसरी पारा!

जालना शहरात दूध आटवून तयार केला जाणारा केसरी पारा खूप प्रसिद्ध आहे.

 हा पारा शरीरासाठी अतिशय उत्तम असतो. 

फास्ट फूडच्या जमान्यात या आरोग्यवर्धक पाऱ्याची टेस्ट घेण्यासाठी लोक दूर दूरवरून इथे येतात. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या गोपाळ टी हाऊस वर मिळणाऱ्या पाऱ्याची चव काही औरच आहे.

गोपाळ कडपे हे या गोपाळ टी हाऊसचे मालक आहेत. 

केसरी पारा बनवण्यासाठी सर्वप्रथम शुद्ध दुधाला गरम करून आटवले जाते. 

यानंतर त्यात घरीच तयार केलेला खास मसाला टाकला जातो.

ग्राहकांच्या मागणी नुसार साधा पारा, स्पेशल पारा अशा स्वरूपात दिला जातो.

स्पेशल पाऱ्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका टाकला जातो. 

साधा पाऱ्याची किंमत 20 रुपये आहे. स्पेशल पारा 30 रुपयांना दिला जातो.