पुण्यात मिळतोय बाहुबली पिझ्झा! कुठं? पाहा

महाराष्ट्राचं प्रमुख सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यातील खाद्यसंस्कृती देखील जगप्रसिद्ध आहे. 

अस्सल मराठी पदार्थांपासून जगभरातील पदार्थ पुण्यात मिळतात.

 शहराच्या प्रत्येक भागात अशी प्रसिद्ध हॉटेल्स असून तिथं पुणेकरांची मोठी गर्दी असते. 

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या पिझ्झाचेही पुण्यात अनेक हॉटेल आहेत. 

रास्ता पेठ भागात तर चक्क बाहुबली पिझ्झा मिळतो. या पिझ्झाची वैशिष्ट्यं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रास्ता पेठेतील हॉट पिझ्झा ब्रँचमध्ये गेल्या 16 वर्षांपासून बाहुबली पिझ्झा मिळतो. 

हा पिझ्झा कमीत कमी 10 इंच इतका मोठा आहे त्यामुळे तो दोन तीन जणांना खावा लागतो म्हणजेच एकटा माणूस तो खाऊ शकत नाही. 

त्यामुळे त्याचं नाव बाहुबली पिझ्झा असं पडलं आहे. हा पिझ्झा मिळणारं हे पुण्यातील एकमेव ठिकाण आहे.

या पिझ्झामध्ये मेयोनीज, एलोपिनोज, ओनियन ऑलिव्ह, टोफु,चीज,सॉस, पनीर,जुकेनी, कॉर्न, बेबी मशरूम आणि डबल चिझ हे पदार्थ वापरले जातात.

 या पिझ्झाची किंमत 350 रुपये आहे

मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची  मेजवानी!

Click Here