सुवर्णरेखेत सापडला 'राघव चितळ'
अमेरिका, बांगलादेशात आढळणारा 'चितळ' पाहून गावकरी हैराण.
पश्चिम बंगालच्या दंतन गावात मासेमार उत्तम रॉय आणि बच्चू रॉय यांनी पकडला चितळ मासा.
बल्लीडंगरी परिसरातून सुवर्णरेखेत टाकलं होतं जाळं.
दोन्ही जाळ्यात अडकला 14 किलोचा तगडा चितळ. बऱ्याच मेहनतीने, मोठ्या शर्थीने काढला बाहेर.
5 फूट 5 उंचीचा माणसाएवढा मासा बघण्यासाठी जमली गर्दी, काढले फोटो.
एवढा मोठा मानवी आकाराचा महाकाय मासा कधीच नाही पाहिला. - बघ्यांची प्रतिक्रिया
माशाला नाव दिलं 'राघव चितळ'.
प्रजननासाठी तो गोड्या पाण्यात आला असावा, असा अंदाज.
माशांची ही लुप्त होत चाललेली प्रजाती वाचवण्याचं पर्यावरणप्रेमींकडून आवाहन.