इथं मिळतं फक्त 25 रुपयात भरपेट जेवण
झारखंड राज्यातील बोकारो इथे मेन रोडवरील चास गरगा पुलाच्या समोर राहुलचे छोले भटुरे खूप प्रसिद्ध आहेत.
इथे ग्राहकांना फक्त 25 रुपयांत भरपेट छोले भटुरे खायला मिळतात.
दुकानदारने सांगितलं की, तो मागील 1 वर्षांपासून याटिकाणी छोले भटुरे विकत आहे.
इथल्या छोले भटुऱ्यांची किंमत फक्त 25 रुपये आहे, जी इतर ठिकांच्या तुलनेत फारच कमी आहे.
याठिकाणी छोले भटुऱ्यांसोबत लोणचं, मिरची आणि सॅलड पण दिले जाते.
दररोज इथे 15 किलो मैदा आणि 7 किलो काबुली चणा वापरला जातो.
या माध्यमातून दिवसाला छोले भटुऱ्याच्या 100 ते 150 प्लेट विकल्या जातात.
सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत हे दुकान सुरू असते.
एका ग्राहकाने सांगितलं की, इथला छोले भटुरा खूपच चविष्ट असतो.