… अखेर मिरा साबळेंच्या हातात लालपरीचं स्टेअरिंग!

 जालना जिल्ह्यातील लालपरीचे सारथ्य करताना आता महिला दिसणार आहेत.

घनसावंगी तालुक्यातील कोठाळा बुद्रुक येथील मीरा साबळे या बसचालक म्हणून रुजू झाल्या आहेत. 

80 दिवसांचे सेवापूर्ण प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. 

अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण केलं. 

यादरम्यान त्यांना केवळ 16.5 रुपये वेतन मिळाले. 

तेवढ्यावरच संसराचा गाडा हाकत त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं.

त्यांनी अंबड ते कुंभार पिंपळगाव ही एसटी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. 

याबद्दल अंबड आगारप्रमुख रणवीर कोळपे यांच्यासह ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

जालना जिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक म्हणून रुजू होण्याचा मान मिळाला आहे. 

 ‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट

Click Here