लातूरमध्ये चक्क उन्हाळी सोयाबीन!

आणखी पाहा...!

लातूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. 

दापका येथील राजाराम देशमुख हे प्रयोगशील शेतकरी आहेत.

देशमुख यांनी चार एकर शेतात उन्हाळी सोयाबीन लावले आहे. 

उन्हाळी सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत नाही. 

उन्हाळ्यात येणाऱ्या सोयाबीनची गुणवत्ता चांगली असते.

देशमुख हे बियाण्यासाठी उन्हाळी सोयाबीन करतात. 

गतवर्षी उन्हाळी सोयाबीनला एकरी 17 क्विंटल उतार मिळाला होता. 

यंदा 18 क्विंटल पेक्षा जास्त उतार मिळेल असे देशमुख सांगतात. 

लातूरचे कृषी सहसंचालक रावसाहेब दिवेकर यांनी सोयाबीनची पाहणी केली.