नादच खुळा! शेतकरी औषध फवारणीसाठी घेतोय चक्क हेलिकॉप्टर
छत्तीसगडमधील बस्तर येथील कोंडागाव जिल्ह्यात राहणारे शेतकरी डॉ. राजाराम त्रिपाठी यांच्याकडे एक हजार एकर शेती आहेत.
ही शेती सांभाळण्यासाठी ते हेलिकॉप्टर खरेदी करणार आहेत.
तर राजाराम त्रिपाठी हे हेलिकॉप्टर खरेदी करणारे राज्यातील पहिले शेतकरी आहेत.
त्यांनी हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी 7 कोटी रुपये खर्चून खरेदी केल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा करारही केला आहे.
वर्षभरात त्यांना R-44 मॉडेलचे 4 सीटर हेलिकॉप्टर मिळेल.
डॉ. राजाराम यांनी एलएलबी, अर्थशास्त्रात एमए आणि तीन संशोधन विषयांत डॉक्टरेट केली आहे.
शेतकरी राजाराम त्रिपाठी हे माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुप चालवतात.
शेती आणि दंतेश्वरी हर्बल ग्रुपमधून त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 25 कोटी रुपये आहे.
हेलिकॉप्टरमधून औषध फवारणी करून पिकांना पुरेशा प्रमाणात औषध टाकता येते, त्यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले.