बीड जिल्हा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
जिल्ह्यातील काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करत आहेत.
करे यांनी अर्धा एकर क्षेत्रावर दोडक्याची लागवड केली.
दोडक्याच्या लागवडीसाठी त्यांना 20 हजार रुपये खर्च आला.
दोडक्याच्या शेतीसाठी मल्चिंग, ठिबक फवारणी केली.
तीन महिन्यानंतर दोडक्याचे उत्पन्न सुरू झाले.
आतापर्यंत जवळपास 4 टन दोडक्याची विक्री बाजारपेठेत झाली आहे.
दोडक्याला बाजारात 50 ते 55 रुपये प्रतिकिलो दर आहे.
आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दोडक्याला रोग प्रतिबंधक फवारणीसह योग्य ती काळजी घ्यावी लागते.
दोडका हे कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक आहे.