सांगलीच्या शेतकऱ्याला मिळालं पेटंट!
आणखी पाहा...!
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करतात.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात द्राक्षांची शेती केली जाते.
काही शेतकरी द्राक्ष शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात.
पलूस तालुक्यातील सातपूरचे जयकर माने हे प्रयोगशील शेतकरी आहेत.
माने यांनी द्राक्षांचा 'ब्लॅक क्वीन बेरी' नावाचा वाण विकसित केला आहे.
'ब्लॅक क्वीन बेरी' या वाणाला नॅशनल रिसर्च सेंटरने पेटंट दिले आहे.
माने यांनी आपल्या द्राक्ष बागेत 2012 मध्ये प्रयोगाला सुरुवात केली होती.
दहा वर्षाच्या प्रयत्नानंतर मानेंनी नवा वाण विकसित केला.
नवीन वाण विकसित करत असताना अनेकांचे मार्गदर्शन मिळाले.
ब्लॅक क्वीन बेरीची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे.
नव्या वाणाला चव आणि उत्पन्नही चांगले आहे.
ब्लॅक क्वीन बेरीला देश आणि विदेशातून मागणी आहे.
माने यांची शेती पाहण्यासाठी शेतकरी, संशोधक येत असतात.
सांगलीतील शेतकऱ्याच्या प्रयोगाला जागतिक मान्यता मिळाली आहे.