वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू

बदलत्या काळात अधिक कल्पतेनं नव्या उत्पादनांची लागवड केली तर शेतीमध्ये यशस्वी होता येतं.

त्यामुळे शेतकरी नवीन प्रयोग करत असतात.

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यानं चक्क काळा गहू पिकवलाय.

या प्रकारची लागवड करणारा तो संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शेतकरी आहे.

राजेश डफर असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे. 

ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या जळगाव या गावाचे रहिवाशी आहेत.

डफर यांनी पहिल्यांदाच काळ्या गव्हाची लागवड केलीय.

सामान्य गव्हाच्या पेरणी प्रमाणेच काळ्या गव्हाची लागवड केली जाते. 

40 किलो बियाण्यांची एक एकरमध्ये पेरणी केली.

आश्चर्य म्हणजे एक एकरात तब्बल 18 क्विंटल काळ्या गव्हाचं उत्पादन झालं,  अशी माहिती राजेश यांनी दिली.

एक किलो काळ्या गव्हाची किंमत 70 रुपये असून तो सामान्य गव्हापेक्षा साधारण चार पट महाग आहे.