तब्बल पाऊण किलोचा कांदा
सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यात उसाची मोठी शेती आहे.
ब्रह्मनाळ येथील शेतकरी हनुमंत शिरगावे हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत.
शिरगावे यांनी उसात अंतरपीक म्हणून कांदा लावला.
लावणीसाठी बाजारपेठेतून नेहमीचे कांद्याचे रोप आणले होते.
उसासोबत कांद्यालाही मुबलक खत आणि पाणी मिळाले.
सध्या उसाच्या भरणीसाठी त्यांनी कांदा काढायला सुरुवात केली.
शेतातील कांदा सरासरी तब्बल 750 ते 800 ग्रॅमपर्यंत भरला.
एवढे मोठे कांदे शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय बनला आहे.
कांद्याचा फड पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत.
उसासाठी केलेला प्रयोग कांद्यासाठीही लागू पडला, असे शिरगावे सांगतात.
सध्या कांद्याला बाजारात दर नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.