आजकाल अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन शेती व्यवसायात उतरत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने नोकरी सोडून शेती सुरू केली आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडीत बाळकृष्ण सहाणे यांची शेती आहे.
सहाणे यांनी गुजरातमधील पेपर मीलमधील नोकरी सोडून शेती सुरू केली.
सहाणे कुटुंबीयांनी आधुनिक पद्धतीने भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली.
सहाणे यांनी जोखीम पत्करून 3 एकर अप्सरा यलो झेंडू लावला.
लागवडीपासून 37 दिवसांत झेंडू काढणीला आला.
तीन एकरात 10 टन झेंडू निघाला असून अजून उत्पन्न सुरू आहे.
झेंडूला 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला.
झेंडू हे बारा महिने वापरत येणारे फुल असल्याने वर्षभर मागणी असते.
सहाणे यांना झेंडूच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.