हातगाडीवर पॅटीस विकून झाला लखपती!
पुण्यातल्या गंज पेठ भागातील सोनल पॅटीस हे गेल्या 48 वर्षांपासून पुणेकरांमध्ये लोकप्रिय आहे.सुरेश सुर्यवंशी यांनी 1974 साली एका हातगाडीवर हे पॅटीस विकण्यास सुरुवात केली होती.
त्यांचं पॅटीस कमी कालावधीमध्ये चांगलंच लोकप्रिय झालं. त्यानंतर त्यांनी छोटसं रेस्टॉरंट सुरू केलं.
आता या पॅटीसची किंमत 20 रुपये इतकी असली तरी ग्राहकांची इथं नेहमी गर्दी असते. दिवसभरात 400 पॅटीसची विक्री होते.
याचाच अर्थ हातगाडीवर व्यवसाय सुरु केलेले सुर्यवंशी आता पॅटीसच्या जोरावर लखपती बनले आहेत.
काय आहे वेगळेपण?
सूर्यवंशी यांनी त्यांना लखपती करणाऱ्या पॅटीसचं वेगळेपणही सांगितले आहे.
पॅटीसमध्ये सहसा स्लाईसचा वापर केला जातो. आम्ही पाव वापरतो. या पावांमध्ये पॅटीसचे सारण भरुन ते डाळीच्या पिठांमध्ये तळतो.
आमच्या पॅटीससोबत विशिष्ट चटणीही मिळते. आंबट, गोड आणि तिखट चटणीच्या चवीमुळे हे पॅटीस ग्राहकांना आवडते.
सोनल पॅटीसला अनेक ग्राहक नियमित भेट देतात. लहान मुलांपासून वयोवृद्ध आजोबापर्यंत सर्वजण येथील ग्राहक आहेत.