मुंबईत फक्त रमजानमध्येच मिळतो 'हा' पदार्थ

मुंबईतील मोहम्मद अली रोड मार्गावरील मिराना मशीदच्या गल्लीत फक्त रमजानच्या महिन्यात प्रसिद्ध सांधल हा पदार्थ मिळतो.

या ठिकाणी हा पदार्थ खाण्यासाठी रमजानच्या महिन्यात मोठी गर्दी असते.

मिनारा मशीदच्या जवळ अमीर खान बेकरी समोर गेल्या 60 वर्षांपासून अभिया कुटूंबीय सांधल हा पदार्थ तयार करून त्याची विक्री करत आहेत. 

तांदळाचं पिठ, साखर, दूध, ड्रायफ्रूट सामग्री वापरू सांधल तयार केलं जातं.

हा पदार्थ तयार करायला 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागतो. 

अगदी पारंपरिक पद्धतीने साधलं हा पदार्थ तयार केला जातो. 

याची किंमत 40 रुपये नग अशी असते.