सोलापुरी प्रसिद्ध चाट तुम्ही खाल्ला आहे का?
सोलापुरी चाट चांगलाच प्रसिद्ध आहे.
सोलापूरच्या पवन पालीलावल यांच्या ओम स्नॅक्स सेंटर येथे हा चाट मिळतो.
आईस्क्रिमचे कोन सारखा दिसणारा हा सोलापुरी चाट आहे.
कसा बनतो चाट?
प्रथम बेसनच्या पापडीप्रमाणे कोनच्या आकारात पापड करून घ्यायची.
पॅनमध्ये स्पेशल बटाटा भाजी, चाट मसाला, काळे तिखट, पिवळे तिखट
मीठ, हळद लसूण पेस्ट ,भाजलेल्या तिखट शेंगा आणि अमोल बटर टाकून व्यवस्थित परतून घ्यावे.
त्यानंतर तयार केलेल्या कोनमध्ये ही रेडी झालेली भाजी टाकून सर्व्ह करावं.
कुठे खाणार?
ओम स्नॅक्स सेंटर, कस्तुरबा मार्केटच्या समोर, बाळवेस, सोलापूर