बॅग पासून ते कुर्तीपर्यंत ‘इथं’ करा खरेदी!
जालना शहरात सध्या विविध वस्तू आणि पदार्थांचे प्रदर्शन सुरू आहे.
या प्रदर्शनात दररोजच्या वापरातील असंख्य वस्तू ऊपलब्ध झाल्या आहेत.
देशभरातील विविध शहरातील प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थ या प्रदर्शनात असल्याने खरेदी साठी जालना शहरातील नागरिक इथे मोठी गर्दी करत आहेत.
शहरातील गांधी चमन परिसरातील दत्त मंदिर समोर हे प्रदर्शन सुरू आहे.
या प्रदर्शनात फॅशन, सौंदर्य प्रसाधने, दागिने, यांसह वेगवेगळे पॅटर्न, डिझाईन असलेले कपडे आहेत.
लेटेस्ट ट्रेण्ड असणारे शूज आणि चप्पल तसेच नमकिन, लोणची, लहान मुलांसाठी खेळणी या गोष्टी उपलब्ध आहेत.
गृहिणींना किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.
हातमागावर तयार करण्यात आलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तसेच पश्चिम बंगाल येथील जुट पासून बनलेल्या बॅग देखील इथे उपलब्ध आहे.