फटाके फुटतील पण प्रदूषण होणार नाही! पाहा काय आहे नवं संशोधन
आनंदाचा क्षण आपण फटाके फोडून करतो.
लग्नसराई, गणेश उत्सव, दिवाळी, निवडणुकांचे निकाल यासह अनेक समारंभात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.
फटाक्यातून निघणाऱ्या घातक धुरामुळे प्रदूषण होते.
नीरी या संस्थेने पर्यावरणपूरक अशा फटाक्यांचे संशोधन केलं आहे.
नीरीने पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक वगळून प्रदूषण कमी करणारे फटाके विकसित केले आहे.
फटाके पर्यावरण पूरक आहे व त्याच्या किमती देखील वीस ते पन्नास टक्क्याहून कमी आहेत.
नागपुरातील बाजारपेठेत हे फटाके दाखल झाले आहेत.