निसर्गरम्य वातावरणात करा सुट्टी एन्जॉय

शिक्षक एकनाथ मुळे यांनी आपल्या शेतावर कृषी पर्यटन ही संकल्पना देखील साकार करून दाखवली आहे.

जालना शहरापासून केवळ 10 किमी अंतरावर जालना मंठा रस्त्यावर सिंधी काळेगाव हे गाव आहे. 

 येथील आपल्या शेतात एकनाथ मुळे यांनी कुसुम अ‍ॅग्री टुरिझम सुरू केलं आहे.

शेतात भटकंती, वेगवेगळ्या पिकांची ओळख, सेल्फी पॉइंट, झोपाळा, हॉर्स रायडिंग, बोट रायडिंग इथे करता येते. 

बैलगाडा सफर, हुरडा पार्टी यासारख्या भन्नाट गोष्टी इथे तुम्हाला अनुभवायला मिळतात.

वीकेंडला निसर्गरम्य वातारणात वेळ घालवण्यासाठी होम स्टे यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तुम्हाला आरोग्यदायी मिळणार आहे. 

 नुकतेच आम्ही नौका विहार ही संकल्पना सुरू केली आहे, असं कुसुम अ‍ॅग्री टुरिझम संचालक एकनाथ मुळे यांनी सांगितले.