एकाच ठिकाणी खा अंड्यांपासून बनवलेले तब्बल 70 पदार्थ!

धावपळीच्या जीवनात शरीराला लागणारे प्रोटीन भरून निघण्यासाठी झटपट बनणारा पदार्थ म्हणून अंड्यांकडे पाहिले जाते.

आज पर्यंत आपण अंडा बॉईल,अंडा आम्लेट, अंडा भुर्जी किंवा अंडा हाफ फ्राय इत्यादी पदार्थ खाल्ले असतील.

परंतु सोलापुरातील एग वर्ल्ड यांच्याकडे अंड्यांपासून बनवलेले तब्बल 70 पदार्थ खायला मिळतात.

काय आहे वैशिष्ट्य?
सोलापुरातील सचिन चाकोते यांनी शक्कल लढवीत अंड्या पासून बनणारे 70  पदार्थ शोधून काढले आहेत.

सचिन यांच्या एग वर्ल्ड या फुड वॅनचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पदार्थात स्वतः तयार केलेले मसाले वापरतात.

अंड्यामधील कोणताही पदार्थ ते तेलामध्ये बनवत नाहीत.

सर्व पदार्थ हे बटरमध्येच बनतात. त्यांच्या सर्व डिशेस पैकी अंडा पाव मसाला आणि अंडा शिक हे फेमस डिशेस आहेत. 

कोणते पदार्थ मिळतात?
अंडा पिझ्झा ,अंडा बर्गर, किंग घोटाळा ,बॉईल तवा मसाला अंडा पॉपकॉर्न , अंडा पाव मसाला ,अंडा पॅटीस, मसाला टोस्ट ,चीज टोस्ट, रेगुलर टोस्ट,टी-ट्वेंटी स्पेशल,

 चीज हाफ फ्राय, अंडा शीख, खीमा मसाला, बॉईल खिमा मसाला, एक चिकन रोल, अंडा लॉलीपॉप असे विशेष डिशेस टेस्ट करायला मिळतील, असं एग वर्ल्ड या फुड वॅनचे मालक सचिन चाकोते यांनी सांगितले.

 कुठे आहे एग वर्ल्ड?MWM5+6VG, शिवगंगा मंदिर रोड, भवानी पेठ, सोलापूर, महाराष्ट्र 413002