अबब! तब्बल 5 किलोचा मुळा!

आणखी पाहा...!

बीड जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. 

बीडमधील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने कमाल केली आहे. 

कोळेवाडीचे शेतकरी ज्ञानदेव नेटके यांनी तब्बल पाच किलोचा मुळा पिकवला आहे.

भूईमुगाच्या पिकात त्यांनी मुळ्याची लागवड केली होती. 

मुळ्याची लागवड केल्यानंतर सेंद्रीय खतांचा वापर केला. 

शेणखता बरोबरच 10-26-26 व सुपरफॉस्फेट हे खत आणि पाणी दिले.

अर्धा गुंठा क्षेत्रात तब्बल 15 मुळे 5 किलोपेक्षा जास्त वजनाचे आढळले.

मुळ्याचे वजन एवढे कसे वाढले आहा कुतुहलाचा विषय आहे. 

कृषी अभ्यासक, संशोधक आणि शेतकरी मुळ्याची शेती पाहण्यासाठी येत आहेत.